शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीशी चाळे करणाऱ्या 55 वर्षीय शिक्षकाला ग्रामस्थांनी चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 23:19 IST

ग्रामीण पोलिसांनी केली सुटका : मुलीचे आई-वडील पोहोचले पोलीस ठाण्यात

ठळक मुद्देअरुण राठोड (५५) रा.जवळा हा शिक्षक बेलोरा ता.यवतमाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे. वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता

यवतमाळ : प्राथमिक शाळेतील ५५ वर्षीय शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला नादी लावले. सलग दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. ती मुलगी महाविद्यालयात गेल्यानंतरही शिक्षक तिला एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने शाळेत बोलवत होता. याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. शनिवारी शिक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. त्याला बेदम चोप देण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून बळाचा वापर करत शिक्षकाची सुटका केली.

अरुण राठोड (५५) रा.जवळा हा शिक्षक बेलोरा ता.यवतमाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे. वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता. शाळा बंद असल्यानंतरही शिक्षक अतिरिक्त वर्ग घेत होता. बऱ्याचदा रविवारीही हा शिक्षक शाळेतच दिसत होता. शनिवारीसुद्धा दुपारी १.३० वाजता शिक्षक शाळेत असताना ग्रामस्थांनी धडक दिली. तेव्हा त्याचे गैरकृत्य उघड्या डोळ्याने दिसले. ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शिक्षकाला चांगलाच चोप दिला. दरम्यान घटनेची माहिती पोलीस पाटलांनी ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार किशोर जुनगरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार पथकासह बेलोरा येथे पोहोचले. मात्र कृत्यामुळे संतापलेले ग्रामस्थ शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी परिस्थिती ओळखून बळाचा वापर करत अरुण राठोड याची जमावाच्या तावडीतून सुटका केली. विद्यार्थिनीला व त्या अरुण राठोड याला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी वृत्त लिहेपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भेट दिली. पीडित मुलीच्या आई-वडिलांशी त्यांनी चर्चा केली. या प्रकरणात तक्रार प्राप्त होताच कठोर कारवाई केली जाईल असेही यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

शिक्षकाचा भाऊ बचावलाअरुण राठोड याला शाळेत डांबून ग्रामस्थ चोप देत असल्याची माहिती मिळताच जवळा येथून त्याचा भाऊ बेलोरा येथे पोहाेचला. त्यालाही ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागत होता. दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी अरुण राठोडच्या मुली व भावाला तेथून जाण्यास सांगितले. जमावाने अरुण राठोडची दुचाकीही पेटवून दिली. काही काळ बेलोरा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस