दोन दिवसांत 53 जण नव्याने पॉझिटिव्ह; 58 जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:28 IST2020-10-26T17:27:39+5:302020-10-26T17:28:02+5:30

corona Virus मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 63 व 55 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार 25 ऑक्टोबर रोजी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 31 जण बरे झाले.  

53 new positives in two days; 58 corona free yavatmal | दोन दिवसांत 53 जण नव्याने पॉझिटिव्ह; 58 जण कोरोनामुक्त

दोन दिवसांत 53 जण नव्याने पॉझिटिव्ह; 58 जण कोरोनामुक्त

यवतमाळ : जिल्ह्यात गत 48 तासात एकूण 53  जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर दोन दिवसात दोन  कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. 
मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 63 व 55 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार 25 ऑक्टोबर रोजी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 31 जण बरे झाले.  गत 24 तासात 60 रिपोर्ट प्राप्त झाले असून यापैकी 11 नव्याने पॉझेटिव्ह आणि 49 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 454 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9932 झाली आहे. आज (दि. 26) 27 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8819 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 317 मृत्युची नोंद आहे. 
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 89089 नमुने पाठविले असून यापैकी 88705 प्राप्त तर 384 अप्राप्त आहेत. तसेच 78773 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Web Title: 53 new positives in two days; 58 corona free yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.