जिल्ह्यात 49 जण कोरोनामुक्त; 21 नव्याने पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 19:36 IST2020-12-28T19:35:19+5:302020-12-28T19:36:58+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.28) एकूण 258 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 21 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

49 corona-free in the district; 21 newly positive | जिल्ह्यात 49 जण कोरोनामुक्त; 21 नव्याने पॉझिटीव्ह

जिल्ह्यात 49 जण कोरोनामुक्त; 21 नव्याने पॉझिटीव्ह

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 49 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 21 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.28) एकूण 258 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 21 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 316 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12551 झाली आहे. 24 तासात 49 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11838 आहे. तर जिल्ह्यात एकूण 397 मृत्युची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 122352 नमुने पाठविले असून यापैकी 121795 प्राप्त तर 557 अप्राप्त आहेत. तसेच 109244 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: 49 corona-free in the district; 21 newly positive