शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

राज्यातील ४५ तालुके पाण्यासाठी आसुसलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:24 PM

आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वरुणराजाने पाठ फिरविली. विदर्भासह राज्यातील ४५ तालुक्यात पावसाचा थेंबही नाही.

ठळक मुद्देपिके करपू लागलीतीन आठवडे कोरडे

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वरुणराजाने पाठ फिरविली. विदर्भासह राज्यातील ४५ तालुक्यात पावसाचा थेंबही नाही. पाऊस नसल्याने पीक वाचविण्यासाठी श्ोतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. त्यातही भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.राज्यभरात एक कोटी हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विदर्भात ४० लाख हेक्टर क्षेत्रात पेरा आहे. चांगल्या पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली. आॅगस्टपर्यंत हे पीक जेमतेम होते. आॅगस्टच्या अखेरच्या आठवडयात पावसाने राज्याकडे पाठ फिरविली. २० ते २५ दिवसांपासून पाऊसच नाही. ओलिताची सोय आहे तेथे वीज उपलब्ध नाही. यामुळे ओलित करायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

अपुरा पाऊस झालेल तालुकेनांदगाव, देवळी (नाशिक), जळगाव, मुक्तीनगर, अमळनेर, धरणगाव (जळगाव), उरण (रायगड), शिरपूर, शिंदखेड (धुळे), शहदा (नंदूरबार), नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासे, राहूरी, संगमनेर, कोपरगाव, राहता (नगर), शिरूर, बारामती (पुणे), पंढरपूर (सोलापूर), आटपाडी (सांगली), औरंगाबाद, पैठण, वैजापूर (औरंगाबाद), जालना, अंबेड, बदनापूर, धनसावंगी (जालना), पाटोदा, अष्टी, धारूर (बिड), परभणी, पाथरी, जिंतूर, मानवत (परभणी), हिंगोली (हिंगोली), देऊळगावराजा (बुलडाणा) या तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही नाही

तीन तालुक्यात निम्मा पाऊसगत तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या तीन तालुक्यात कमी पाऊस पडतो आहे. यावर्षी पुन्हा कमी पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी ५० टक्केच्या आतमध्ये पाऊस नोंदविला गेला आहे. त्यामध्ये कळंब तालुक्यात ४८ टक्के, राळेगाव ४८ टक्के, यवतमाळ ५४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यावर्षी नैऋत्य मोसमी वारे न येता पश्चिम आणि पूर्वेकडून अरबी समुद्रातून वारे आले. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडला. यात एकसमान दाब नव्हता. यामुळे कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस झाला. याला निसर्गाचा असमतोल कारणीभूत आहे.-सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :agricultureशेती