शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत डेंग्यूचे ४१ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

गतवर्षी साथरोगाने जिल्ह्यात उद्रेक केला होता. डेंग्यू रूग्णाची संख्या जिल्ह्यात ४९४ वर पोहलची होती. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले होते. यावर मात करण्यासाठी यावर्षी हिवताप विभागान जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणावर भर दिला. सध्या ४१ रूग्णाची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देसर्वाधिक यवतमाळात : सात प्राथमिक आरोग्य केंद्र अतिजोखमीचे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यात साथरोगाचा फैलाव होतो. यावर्षी जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणाचे काम हाती घेण्यात आले. गत सहा महिन्यात ४१ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने केली. ४१ डेंग्यू रूग्ण आढळलेले ७ प्राथमिक आरोग्य केंद्र अतिजोखीम क्षेत्रात आले आहेत.गतवर्षी साथरोगाने जिल्ह्यात उद्रेक केला होता. डेंग्यू रूग्णाची संख्या जिल्ह्यात ४९४ वर पोहलची होती. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले होते. यावर मात करण्यासाठी यावर्षी हिवताप विभागान जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणावर भर दिला. सध्या ४१ रूग्णाची नोंद करण्यात आली. यामध्ये यवतमाळ १४, दारव्हा ७ , नेर ५, राळेगाव ३, घाटंजी ३, झरी १, कळंब १, दिग्रस १, आर्णी ४, महागाव १ अशा ४१ रूग्णांची नोंद जिल्ह्यामध्ये करण्यात आली.यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, नेर येथील सात प्राथमिक आरोग्य केंद्र अतिजोखीम क्षेत्रात मोडणार आहेत. या आजाराची साखळी तोडता येते. यासारठी अतिजोखीम क्षेत्रात आशासह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.गप्पी मासे पैैैैैैदास केंद्रांचा पर्यायडासांच्या अळ्या नष्ट करण्याचे काम गप्पी मासे करतात. अलीकडे गप्पी मासे सोडण्यासाठी नागरिकांना ही प्रजाती उपलब्ध होत नाही. यामुळे अडचणी निर्माण होतात. डब्ल्यूसीएलमध्ये असलेल्या खड्ड्यात गप्पी मासे सोडण्याच्या सूचना हिवताप विभागाने दिल्या आहेत. हे मासे डेंग्यूच्या डासांच्या अंड्यांचा नायनाट करतात आणि आजाराची साखळी तोडते.साथरोग नियंत्रणात मलेरियाचे ५० क्लिनिक उभारण्यात आले आहे. तर डेंग्यूची एलायझा टेस्ट यवतमाळात उपलब्ध आहे. यामुळे उपचार तत्काळ होण्यास मोलाचा हातभार लागत आहे. शहरी भागातील रिकामे प्लॉट, साचलेले पाणी या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. असे भाग तत्काळ स्वच्छ करण्याचे पत्र आरोग्य विभागाने दिले आहे. मात्र या पत्राला नगरपरिषद, ग्रामपंचायत क्षेत्रातून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.

टॅग्स :Socialसामाजिक