वीज कंत्राटदारांना ४०० कोटींचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:39 IST2017-09-25T22:39:14+5:302017-09-25T22:39:43+5:30
कृषिपंपाचा अनुशेष दूर करण्यासाठी उधारित कामे करणाºया वीज कंत्राटदारांना सुमारे ४०० कोटींचा ‘झटका’ बसला आहे.

वीज कंत्राटदारांना ४०० कोटींचा ‘शॉक’
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषिपंपाचा अनुशेष दूर करण्यासाठी उधारित कामे करणाºया वीज कंत्राटदारांना सुमारे ४०० कोटींचा ‘झटका’ बसला आहे. सहा महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने कंत्राटदार अडचणीत आले आहे. सोमवारी येथे वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना कंत्राटदारांनी घेराव घालून आपला रोष व्यक्त केला.
सुरुवातील देयके झपाट्याने मिळाली. उर्वरित कामेही तेवढ्याच झपाट्याने कंत्राटदारांनी पूर्ण केली. देयके तत्काळ काढली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाही.
आजपर्यंत कामाचे ४०० कोटी रुपये त्यांना मिळालेच नाही. यासंदर्भात पाठपुरावा केला. उपयोग होत नसल्याने सोमवारी मराठवाडा आणि विदर्भातील कंत्राटदारांनी एकाचवेळी ठिय्या आंदोलन केले. वीज अधीक्षक अभियंत्यांना त्यांच्या कक्षात घेराव करण्यात आले. बुधवारपासून बेमुदत उपोषण करण्याचे संघटनेने जाहीर केले.
जिल्हा कंत्राटदार संघटनेने यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश काळे, गजानन तंबाखे, अतुल पाटील, मनोज गाढवे, अतुल असरकर, विजय बेलोरिया, पंकज मराठे, राम कदम, समिर भागवतकर आदी उपस्थित होते.