शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये १३ पोलिसांसह ३४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

कोरोनाचा कहर सुरू आहे. रविवारी कोरोनाने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे तालुक्यात कोरोना बळींची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८४८ वर गेला आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिक व प्रशासन दहशतीत सापडले आहे. शनिवारी रात्री उशिरा २८ व रविवारी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्देदोघांचा मृत्यू : अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली २३३ वर, एकूण बाधित ८४८

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी १३ पोलीस कर्मचाऱ्यांसह ३४ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २३३ वर गेली आहे.कोरोनाचा कहर सुरू आहे. रविवारी कोरोनाने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे तालुक्यात कोरोना बळींची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८४८ वर गेला आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिक व प्रशासन दहशतीत सापडले आहे. शनिवारी रात्री उशिरा २८ व रविवारी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खंडाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील देवी वॉर्ड व तालुक्यातील रंभा येथील प्रत्येकी एक अशा दोन पुरुषांचा कोरोनाने बळी घेतला. विशेष म्हणजे परस्पर बाहेर जिल्ह्यात उपचारासाठी गेलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आणखी २० जणांचा बाहेरच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा धावपळ करीत आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेक नागरिक शासकीय नियमांचे पालन करताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी अनेकजण विना मास्क फिरतात. सार्वजनिक स्थळे आणि अनेक दुकानांमध्ये गर्दी होत आहे. नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोनाची साखळी तोडणे अवघड झाले आहे. आता प्रशासनानेही कठोर उपाययोजना सुरू केल्या आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरण्यांविरुद्ध आता ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुसºया वेळी मास्कविना आढळल्यास फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, बीडीओ शिवाजी गवई, मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड आदींनी केले आहे.दोन खासगी रुग्णालयात कोविड केअर सेंटररुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याला मंजुरी दिली आहे. यापूर्वी आयुर्वेद महाविद्यालयात १०० बेडचे डीसीएचसी सेंटर सुरू आहे. तेथे रुग्णांवर उपचार केले जातात.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या