पुसदमध्ये १३ पोलिसांसह ३४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST2020-09-14T05:00:00+5:302020-09-14T05:00:06+5:30

कोरोनाचा कहर सुरू आहे. रविवारी कोरोनाने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे तालुक्यात कोरोना बळींची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८४८ वर गेला आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिक व प्रशासन दहशतीत सापडले आहे. शनिवारी रात्री उशिरा २८ व रविवारी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

34 positive including 13 policemen in Pusad | पुसदमध्ये १३ पोलिसांसह ३४ पॉझिटिव्ह

पुसदमध्ये १३ पोलिसांसह ३४ पॉझिटिव्ह

ठळक मुद्देदोघांचा मृत्यू : अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली २३३ वर, एकूण बाधित ८४८

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी १३ पोलीस कर्मचाऱ्यांसह ३४ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २३३ वर गेली आहे.
कोरोनाचा कहर सुरू आहे. रविवारी कोरोनाने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे तालुक्यात कोरोना बळींची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८४८ वर गेला आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिक व प्रशासन दहशतीत सापडले आहे. शनिवारी रात्री उशिरा २८ व रविवारी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खंडाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील देवी वॉर्ड व तालुक्यातील रंभा येथील प्रत्येकी एक अशा दोन पुरुषांचा कोरोनाने बळी घेतला. विशेष म्हणजे परस्पर बाहेर जिल्ह्यात उपचारासाठी गेलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आणखी २० जणांचा बाहेरच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा धावपळ करीत आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेक नागरिक शासकीय नियमांचे पालन करताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी अनेकजण विना मास्क फिरतात. सार्वजनिक स्थळे आणि अनेक दुकानांमध्ये गर्दी होत आहे. नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोनाची साखळी तोडणे अवघड झाले आहे. आता प्रशासनानेही कठोर उपाययोजना सुरू केल्या आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरण्यांविरुद्ध आता ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुसºया वेळी मास्कविना आढळल्यास फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, बीडीओ शिवाजी गवई, मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड आदींनी केले आहे.

दोन खासगी रुग्णालयात कोविड केअर सेंटर
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याला मंजुरी दिली आहे. यापूर्वी आयुर्वेद महाविद्यालयात १०० बेडचे डीसीएचसी सेंटर सुरू आहे. तेथे रुग्णांवर उपचार केले जातात.

Web Title: 34 positive including 13 policemen in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.