३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:03 IST2018-03-08T22:03:44+5:302018-03-08T22:03:44+5:30

तवेरा वाहनातून शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली.

32 lakh suspicious cash seized | ३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त

३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त

ठळक मुद्देमोहा फाट्यावर कारवाई : टोळीविरोधीपथकाने चौघांना अटक

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : तवेरा वाहनातून शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली. या रकमेबाबत कुठलाही अधिकृत पुरावा देऊ न शकल्याने वाहनातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई टोळीविरोधी पथकने केली.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेकडून यवतमाळकडे तवेरा कार (एम.एच.१८-डब्ल्यू-५५३४) बुधवारी रात्री यवतमाळकडे येत होते. मोहा फाट्यावर टोळीविरोधी पथकाने तपासणी दरम्यान सदर कार थांबविली. झडती घेतली असता कारमध्ये प्लास्टिकच्या पोत्यात ३२ लाख १३ हजार ८०० रुपयांची रोकड आढळून आली. यात दोन हजार, पाचशे, दोनशे व १०० रुपयांच्या नोटांचे बंडल होते.
या रकमेबाबत वाहनातील राजेश रामलू बत्तीनीवार (४०) रा. चनाखा ता. पांढरकवडा, श्रीहरी लिंगय्या यादगीरीवार (५७) रा. शिरपूर जि. धुळे, देवराव आसन्ना रोडडावार (३३) रा. चनाखा ता. पांढरकवडा, बालराज राजेय्या कंकेटीवार (३८) रा.पेददाकोडू जि. सिंददीपेठ (तेलंगणा) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ही रक्कम कोठून तरी चोरुन, लुटून किंवा फसवणूक करून आणल्याचा संशय बळावल्याने या सर्वांना ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष मनवर, सहायक फौजदार ऋषि ठाकूर, जमादार संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाने, विनोद राठोड, जयंत शेंडे, राजू कांबळे, श्रीधर शिंदे, नीलेश पाटील, आकाश सहारे यांनी केली.

Web Title: 32 lakh suspicious cash seized