राळेगावात ३२ जोडपी विवाहबद्ध

By Admin | Updated: May 13, 2017 00:28 IST2017-05-13T00:28:58+5:302017-05-13T00:28:58+5:30

दीनदलित बहुद्देशीय आदिवासी ग्रामीण विकास संस्थेद्वारा बळीराजा चेतना अभियानांतर्गत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येथील

32 couple married in Ralegaon | राळेगावात ३२ जोडपी विवाहबद्ध

राळेगावात ३२ जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : दीनदलित बहुद्देशीय आदिवासी ग्रामीण विकास संस्थेद्वारा बळीराजा चेतना अभियानांतर्गत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडला. यात ३२ जोडपी विवाहबद्ध झाली.
यावेळी आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, बाबाराव मडावी, दशरथ मडावी, नगराध्यक्ष बबन भोंगारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, माजी उपसभापती सुरेश मेश्राम, संदीप पेंदोर, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आयोजक संस्थेच्या सचिव रचना किरण कुमरे यांच्या पुढाकारात सर्व जोडप्यांना गॅस कनेक्शन भेट देण्यात आले. आयोजक संस्थेचे उपाध्यक्ष किरण कुमरे यांच्या पुढाकारात हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी शेतकरी कुटुंबातील जोडप्यांची प्रामुख्याने निवड करण्यात आली होती. शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच राज्यातील दुष्काळी स्थिती आदी कारणांमुळे शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील विवाह या मेळाव्यात करण्यात आले असल्याचे किरण कुमरे यांनी सांगितले. मेळाव्यासाठी आयोजक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला.

Web Title: 32 couple married in Ralegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.