१७७ ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर
By Admin | Updated: March 31, 2015 01:54 IST2015-03-31T01:54:55+5:302015-03-31T01:54:55+5:30
जिल्ह्यातील आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या १७७ ग्रामपंचायींची निवडणूक लांबणीवर पडली असून पूर्वी

१७७ ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर
यवतमाळ : जिल्ह्यातील आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या १७७ ग्रामपंचायींची निवडणूक लांबणीवर पडली असून पूर्वी घोषित ६६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ मे व जूलै महिन्यात मुदत पूर्ण होत असलेल्या ४८६ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.
यापूर्वी जाहीर करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रमानुसारच ४८६ ग्रामपंचायतीची प्रक्रिया होणार आहे. यामध्ये नामांकनासोबत उमेदवाराला जात पडताळणी प्रमाणपत्राची पोच पावती जोडणे बंधनकारक केले आहे. निवडणूक आयोगाने आमदारांच्या सूचनेवरून आॅगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे घेण्याचा निर्णय घेतला. त्यावरून जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता केवळ ४८६ ग्रामपंचायतीमध्ये घमासान होणार आहे. निर्णयाच्या अदलाबदलीमुळे गाव पुढाऱ्यांत संभ्रम निर्माण झाली आहे. वेळेवरच निर्णय बदलल्याने कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्यायचा या आकडेवारीची जुळवाजुळ निवडणूक विभागात सुरू होती. अनेकांनी तहसील कार्यालयात धाव होऊन ग्रामपंचायतीची मुदत केव्हा संपते आणि निवडणूक केव्हा होणार याची खातरजमा करून घेतली. अचानक निवडणूक जाहीर झाल्याने कागदपत्राची जुळवाजुळव करण्यात गाव पुढारी व्यस्त आहेत. अनेकांनी इच्छुकांच्या जात प्रमाण पत्रासठी उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. हे प्रमाणपत्र घेऊन आता त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर कराव लागणार आहे.
नामांकनासोबत जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्याची पोच जोडावी लागणार आहे. शिवाय सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाण पत्र देण्यात येईल , असे हमी पत्र द्यावे लागणार आहे. अन्यथा या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. या अटींची पूर्तता करतानाच गाव पुढाऱ्यांचा कस लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)