जिल्ह्यातील १६ सहायक पोलीस निरीक्षकांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 17:52 IST2019-06-18T17:52:23+5:302019-06-18T17:52:32+5:30

कळंब-लाडखेडला मुदतवाढ : दहा अधिकारी जिल्ह्यात आले

16 assistant police inspectors transferred in the district | जिल्ह्यातील १६ सहायक पोलीस निरीक्षकांची बदली

जिल्ह्यातील १६ सहायक पोलीस निरीक्षकांची बदली

यवतमाळ : अमरावती परिक्षेत्रांतर्गत सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली आहे. अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशावरून या बदल्या झाल्या आहे. यामध्ये यवतमाळातील १६ अधिकाऱ्यांनी अमरावती विभागात इतर ठिकाणी देण्यात आले आहे. तर दहा अधिकारी रिक्त जागेवर आले आहेत. 


जिल्ह्यातून धीरन चव्हाण, दिलीप मसराम, आनंद पिदूरकर, सतीश वळवी, दीपक पवार, अशोक हुलगे, लहू तावरे, प्रकाश राऊत, शिवाजी लष्करे, नितीन पतंगे, शैलेश ठाकरे, संग्राम ताठे, संघरक्षक भगत, महादेव पडघन या सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहे तर जिल्ह्यात अमरावती ग्रामीण येथून अजय आखरे, शेषराव नितनवरे, प्रवीण तळी, बुलडाणा येथून प्रशांत सपकाळे, विश्वनाथ कारेगावकर, संदीप गाढे, निखिल फटींग, वाशिम येथून समाधान वाठोरे, विनायक जाधव, विजय रत्नपारखी हे अधिकारी आले आहेत. 


पोलीस महानिरीक्षकांनी कळंब व लाडखेड ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले सहायक निरीक्षक नरेश रणधीर आणि सारंग मिराशी यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तर समाधान धनरे यांच्या बदलीला सेवानिवृत्तीपर्यंत स्थगिती आहे.

Web Title: 16 assistant police inspectors transferred in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.