पंढरपूर यात्रेसाठी १५३ एसटी बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:35 IST2019-06-28T21:34:45+5:302019-06-28T21:35:00+5:30
आषाढी एकादशी उत्सवानिमित्त पंढरपूर येथे हाणाऱ्या भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून १५३ बसेस सोडल्या जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून ८ जुलैपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहे.

पंढरपूर यात्रेसाठी १५३ एसटी बसेस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आषाढी एकादशी उत्सवानिमित्त पंढरपूर येथे हाणाऱ्या भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून १५३ बसेस सोडल्या जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून ८ जुलैपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यवतमाळ आगारातून ३०, पुसद ३०, वणी १२, उमरखेड २५, दारव्हा १२, पांढरकवडा-नेर प्रत्येकी १२ आणि दिग्रस-दारव्हा आगारातून प्रत्येकी १० बसेस सोडण्यात येणार आहेत. शिवाय गावातून बस सोडण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अॅडव्हान्स बुकिंग करावी लागणार आहे. संबंधित आगारातून यासाठी माहिती आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटीनेच प्रवास करावा, अशी विनंती विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी केली.