दारव्हा येथे १४४ जणांनी केले रक्तदान

By Admin | Updated: February 25, 2017 01:03 IST2017-02-25T01:03:18+5:302017-02-25T01:03:18+5:30

शिवजयंतीचे औचित्य साधून साईसार्थ फाऊंडेशन व मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर व सत्कार सोहळा

144 people took blood donation at Darwha | दारव्हा येथे १४४ जणांनी केले रक्तदान

दारव्हा येथे १४४ जणांनी केले रक्तदान

दारव्हा : शिवजयंतीचे औचित्य साधून साईसार्थ फाऊंडेशन व मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर व सत्कार सोहळा येथील पाटील कॉम्प्लेक्ससमोर पार पडला. यावेळी १४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरापूर्वी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवृत्त नायब तहसीलदार नामदेवराव जाधव बोदेगाव, दारव्हा येथील मुस्तफा पटेल, शेती क्षेत्रातील श्रीराम ठाकरे, बिजोरा, सतीश बनसोड डोल्हारी, ज्ञानेश्वर काजळे मांगकिन्ही यांचा तर गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, ठाणेदार अनिलसिंह गौतम, नगराध्यक्ष बबनराव इरवे, प्रा.संगीता घुईखेडकर यांचे हस्ते करण्यात आला.
रक्तदान शिबिराला युवक, महिला तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग दर्शविला. येथील रक्तदाते किशोर घेरवरा यांची या शिबिरात ८५ व्या वेळी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रवि शिंदे, भैरव भेंडे, नितीन कोल्हे, अमोल बोबडे, राजीव शिंदे, राम पापळकर, विवेक ठाकरे, गजानन ठाकरे, मंगेश इंगोले व मित्रमंडळाने प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

Web Title: 144 people took blood donation at Darwha