पिकाच्या भरपाईसाठी १४ हजारांवर अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:20+5:30
वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते. १४ हजार ४०४ शेतकºयांनी नुकसानभरपाईचा दावा केल्यानंतर वन विभागाने चार कोटी ३२ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मात्र झालेले नुकसान व मिळणारी मदत यात मोठी तफावत आहे. शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आला आहे. जंगलालगतच्या शेतांना शासनाकडूनच पक्के कूंपन देण्यात यावे, वन्यजीवांचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाच्या मागण्या होत आहे.

पिकाच्या भरपाईसाठी १४ हजारांवर अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वन्यप्राणी व शेतकरी हा जुनाच संघर्ष आता नव्याने पेटला आहे. २०१९-२० या खरीप हंगामात वन्यप्राण्यांनी सर्वच पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त करणे कायद्याच्या चाकोरीत बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यादेखत पिकांचे नुकसान होताना पहावे लागते. मेहनतीने फुलविलेले पीक रानडुक्कर, निलगाय, हरीण हे वन्यप्राणी काही तासातच पीक उद्ध्वस्त करतात. वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील १४ हजार ४०४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे.
वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते. १४ हजार ४०४ शेतकºयांनी नुकसानभरपाईचा दावा केल्यानंतर वन विभागाने चार कोटी ३२ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मात्र झालेले नुकसान व मिळणारी मदत यात मोठी तफावत आहे. शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आला आहे. जंगलालगतच्या शेतांना शासनाकडूनच पक्के कूंपन देण्यात यावे, वन्यजीवांचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाच्या मागण्या होत आहे.
पीक वाचविण्यासाठी बरेचदा शेतकरी कायदा हातात घेतात. मात्र त्यातही त्यांचेच नुकसान होते. शेतातील पीक वाचविणारा शेतकरीच वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या गुन्ह््यात अडकतो.