शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

१४ शेतकरी शिकार, १७२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:56 IST

वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांचे हल्ले : यवतमाळ वनवृत्तात वाघ, रानडुकरांची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे. पेरणी करताच शेतात मुक्कामाला जावे लागत आहे.वनवृत्तात येणाऱ्या यवतमाळ, पांढरकवडा, पुसद या तीन वनविभागातील स्थिती अतिशय बिकट आहे. पांढरकवडा उपविभागात नरभक्षक वाघिणीने आत्तापर्यंत १४ बळी घेतले. यवतमाळ उपविभागात रानडुक्कर आणि अस्वलाची दशहत आहे. यवतमाळ वनविभागात २८ जण जखमी झाले, तर पुसदमध्ये २९, पांढरकवडात ३१, अकोला-वाशिम वनविभागात ३६ जण जखमी झाले. पाचही वनविभागात ३३४ पाळीव पशू ज्यात गाय, म्हैस, बैल, बकरी यांचा फडशा पाडला आहे. वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी अनेक शेताकडे फिरकण्याची सोय उरलेली नाही. वन विभाग नुकसानीचे पंचनामे करून तुटपुंजी मदत देते. जखमींना तर या मदतीतून पुरेपूर उपचारही घेता येत नाही. आत्तापर्यंत मदतीपोटी जखमींना ६७ लाख २७ हजार दिले गेले. पशुधन हानीत ३४ लाख ५६ हजार, पीक नुकसानीच्या मोबदल्यात पाच कोटी २२ लाखांची मदत दिली गेली. जीवितहानी हानी झाल्यास प्रत्येकी आठ लाख रुपये कुटुंबीयांना दिले.शेतकºयांना वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करताना स्वत:चा बळी द्यावा लागत आहे. रानडुकरांचे भरदिवसा हल्ले होत आहेत. यावर वनविभागाने तातडीने पर्याय शोधण्याची गरज आहे.पीक पॅटर्न बदलल्याने पशुसंगोपनाचा प्रश्नरानडुकरांच्या त्रासामुळे खरिपातील ज्वारीची पेरणीच निम्म्यावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात केवळ २५ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, मूग नऊ हजार ३५४ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. बाजारभाव चांगला व अधिक नफा देणारे हे पीक नाईलाजाने शेतकऱ्यांना सोडावे लागले आहे. ज्वारीसारखे चारा पीकच घेता येत नसल्याने, भविष्यात भीषण चारा टंचाई निर्माण होते. याला कंटाळून शेतकऱ्यांनी पशुधन कमी केले आहे. एकीकडे शासन दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांमुळे चारा पीक नसल्याने पशु संगोपनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही समस्यांची गुंतागुंत सोडविण्यासाठी ठोस धोरण आखण्याची नितांत आवश्यकता आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी