१४ शेतकरी शिकार, १७२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:55 PM2018-08-22T21:55:54+5:302018-08-22T21:56:32+5:30

वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे.

14 farmers killed, 172 injured | १४ शेतकरी शिकार, १७२ जखमी

१४ शेतकरी शिकार, १७२ जखमी

Next
ठळक मुद्देवन्य प्राण्यांचे हल्ले : यवतमाळ वनवृत्तात वाघ, रानडुकरांची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे. पेरणी करताच शेतात मुक्कामाला जावे लागत आहे.
वनवृत्तात येणाऱ्या यवतमाळ, पांढरकवडा, पुसद या तीन वनविभागातील स्थिती अतिशय बिकट आहे. पांढरकवडा उपविभागात नरभक्षक वाघिणीने आत्तापर्यंत १४ बळी घेतले. यवतमाळ उपविभागात रानडुक्कर आणि अस्वलाची दशहत आहे. यवतमाळ वनविभागात २८ जण जखमी झाले, तर पुसदमध्ये २९, पांढरकवडात ३१, अकोला-वाशिम वनविभागात ३६ जण जखमी झाले. पाचही वनविभागात ३३४ पाळीव पशू ज्यात गाय, म्हैस, बैल, बकरी यांचा फडशा पाडला आहे. वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी अनेक शेताकडे फिरकण्याची सोय उरलेली नाही. वन विभाग नुकसानीचे पंचनामे करून तुटपुंजी मदत देते. जखमींना तर या मदतीतून पुरेपूर उपचारही घेता येत नाही. आत्तापर्यंत मदतीपोटी जखमींना ६७ लाख २७ हजार दिले गेले. पशुधन हानीत ३४ लाख ५६ हजार, पीक नुकसानीच्या मोबदल्यात पाच कोटी २२ लाखांची मदत दिली गेली. जीवितहानी हानी झाल्यास प्रत्येकी आठ लाख रुपये कुटुंबीयांना दिले.
शेतकºयांना वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करताना स्वत:चा बळी द्यावा लागत आहे. रानडुकरांचे भरदिवसा हल्ले होत आहेत. यावर वनविभागाने तातडीने पर्याय शोधण्याची गरज आहे.
पीक पॅटर्न बदलल्याने पशुसंगोपनाचा प्रश्न
रानडुकरांच्या त्रासामुळे खरिपातील ज्वारीची पेरणीच निम्म्यावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात केवळ २५ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, मूग नऊ हजार ३५४ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. बाजारभाव चांगला व अधिक नफा देणारे हे पीक नाईलाजाने शेतकऱ्यांना सोडावे लागले आहे. ज्वारीसारखे चारा पीकच घेता येत नसल्याने, भविष्यात भीषण चारा टंचाई निर्माण होते. याला कंटाळून शेतकऱ्यांनी पशुधन कमी केले आहे. एकीकडे शासन दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांमुळे चारा पीक नसल्याने पशु संगोपनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही समस्यांची गुंतागुंत सोडविण्यासाठी ठोस धोरण आखण्याची नितांत आवश्यकता आहे.

Web Title: 14 farmers killed, 172 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.