शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात १४ कोटींची विकास कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

नगरोत्थान महाअभियान यातून सात कोटी एक लाख ५१ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये नगरपरिषद हिस्सा २५ टक्के असे एक कोटी ७५ लाख रुपये पालिकेला भरावे लागणार आहे. नगरोत्थानअंतर्गत एकूण २७ कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने डांबरी रस्ते, मोठ्या नाल्यांना स्टेनिंग वॉल, काँक्रिट रस्ते याचा समावेश आहे. नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून सहा कोटी आठ लाख १७ हजार ५६ रुपयांची २२ कामे हाती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देपावसाळ्याचा मुहूर्त : नगरोत्थान व नागरी दलित वस्ती सुधार योजना, डांबरीकरणावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेने शहरात एकाच वेळी १३ कोटी ९६ लाख आठ हजार ५६ रुपयांची कामे सुरू होत आहेत. नगरपरिषदेला नगरोत्थान महाअभियान व नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी खर्च करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पालिकेकडे २०१९-२० या आर्थिक वर्षातील योजनेचा निधी अखर्चित होता. त्यातील कामांना आता सुरुवात होत आहे.नगरोत्थान महाअभियान यातून सात कोटी एक लाख ५१ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये नगरपरिषद हिस्सा २५ टक्के असे एक कोटी ७५ लाख रुपये पालिकेला भरावे लागणार आहे. नगरोत्थानअंतर्गत एकूण २७ कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने डांबरी रस्ते, मोठ्या नाल्यांना स्टेनिंग वॉल, काँक्रिट रस्ते याचा समावेश आहे. नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून सहा कोटी आठ लाख १७ हजार ५६ रुपयांची २२ कामे हाती घेण्यात आली आहे. यामधूनही डांबरीकरण, रस्ता रुंदीकरण व सिमेंट काँक्रीट रस्ते याचा समावेश आहे. नगरपरिषदेने याला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्याकडून तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे. नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून २२ व नगरोत्थानमधून २७ अशा ४९ कामांना एकाच वेळी सुरुवात होत आहे. यामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्ते, नाल्या ही कामे होणार आहेत.नगरपरिषदेचे अभियंता विनायक देशमुख यांच्या स्तरावर कामांचे नियोजन केले जात आहे. आतापर्यंत प्रक्रियेत रखडलेली कामे पावसाळ्याच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकताशहरात यापूर्वी वाढीव भागातील रस्ते व इतर विकास कामांकरिता १४ कोटींचा निधी विशेष परिश्रमाने आणला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कामे अतिशय घाईघाईत उरकण्यात आली. कधी नव्हे वाढीव क्षेत्रातील भागात डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र घाईगडबडीत याची गुणवत्ता राखल्या गेली नाही. आता हे रस्ते उखडले आहेत. होऊ घातलेल्या कामांची गुणवत्ता राखली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका