यवतमाळात ८२ पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात १३५ जण भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 18:40 IST2020-05-07T18:40:22+5:302020-05-07T18:40:51+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉडमध्ये ८२ ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण १३५जण भरती आहेत. यात प्रिझमटिव्ह केसेसची संख्या ५३ असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.

यवतमाळात ८२ पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात १३५ जण भरती
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉडमध्ये ८२ ॲक्टीव पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण १३५जण भरती आहेत. यात प्रिझमटिव्ह केसेसची संख्या ५३ असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
गत २४ तासात आयसोलेशन वॉर्डात दोन जण भरती झाले आहे. गुरवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता १४५ नमुने पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या १३६९ आहे. यापैकी १२२४ रिपोर्ट प्राप्त तर आज पाठविलेले १४५ रिपोर्ट अप्राप्त आहेत. प्राप्त नमुन्यांपैकी आतापर्यंत ११३२ नमुने निगेटिव्ह आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात १०९ तर गृह विलगीकरणात एकूण ११२१ जण आहेत.
जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची वाढती संख्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. अशा परिस्थिातीत शासन आणि प्रशासन आपल्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे. या संकटाच्या वेळी सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. घराबाहेर पडू नये. आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित राहायचे असेल तर घरातच रहा. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडतांना मास्कचा वापर करावा तसेच कुठेही गर्दी करू नये. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.