१२०० नळयोजना टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:27 IST2017-11-18T22:26:59+5:302017-11-18T22:27:16+5:30
जिल्ह्यातील १२०० नळजोडण्यांकडे २३ कोटी रूपयांचे वीजबिल अनेक महिन्यांपासून थकले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे.

१२०० नळयोजना टार्गेट
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्ह्यातील १२०० नळजोडण्यांकडे २३ कोटी रूपयांचे वीजबिल अनेक महिन्यांपासून थकले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात ही मोहीम पुढे आल्याने ग्रामपंचायती हादरल्या आहेत.
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस झाला. अनेक तालुक्यात हा पाऊस ४० ते ५० टक्केच्या घरात आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन कठोर उपाययोजना करीत आहेत.
तर दुसरीकडे याच सुमारास वीज वितरण कंपनी कठोर पावले उचलणार आहे. थकीत वीजबिलाचे पैसे न भरणाºया नळयोजनांच्या वीज जोडण्या कापणार आहे. यामुळे पाणीटंचाईच्या काळात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना पाच हप्ते पाडून देण्यात आले आहे. मात्र, पाणीकराची वसुलीच न झाल्याने वीजबिल भरता आलेले नाही.