शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

१२ कोळसा खाणी, तरीही वीज प्रकल्पाची प्रतीक्षाच

By admin | Updated: August 17, 2016 01:14 IST

वणी परिसरात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही या परिसराला वीज प्रकल्प सतत हुलकावणी देत आहेत.

शासन उदासीन : वणीतून परराज्यात वीज निर्मितीसाठी जातो कोळसा वणी : वणी परिसरात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही या परिसराला वीज प्रकल्प सतत हुलकावणी देत आहेत. चार ते पाच वीज निर्मिती प्रकल्प येणार असल्याचा गवगवा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात एकही वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला नाही. तालुक्यात वीज प्रकल्प कधी साकारणार, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. वीज ही जीवनावश्यक बाब झाली आहे. घरोघरी आणि खेडोपाडी वीज पोहोचली आहे. बोटावर मोजण्याईतपत गावातच वीज पोहोचली नाही. परिणामी राज्यात विजेला प्रचंड मागणी आहे. मात्र त्या तुलनेत वीज निर्मिती होत नसल्याने ग्राहकांना विजेचा तुटवडा भासतो. परिणामी जनतेला भारनियमनाशी झुंज द्यावी लागते. उन्हाळ्यात ग्रामीण भाग तर भारनियमनाने अक्षरश: होरपळून निघतो. ग्रामीण भागातील लघु व्यावसायीक भारनियमनाने आर्थिक संकटात सापडतात. अनेकांचे व्यवसाय दिवसा बंद राहातात. जनतेलाही अंधाराचा सामना करावा लागतो. जनतेला भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी नवे वीज प्रकल्प उभारण्याची गरज आहे. तथापि त्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. वणी परिसरात वीज निर्मितीसाठी आवश्यक दगडी कोळशाचा मुबलक साठा आहे. मात्र येथे वीज निर्मिती होत नाही. परिसरात वेकोलिच्या जवळपास १२ खुल्या आणि भूमिगत कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून दररोज लाखो टन कोळसा बाहेर काढला जातो. तोच कोळसा येथील रेल्वे सायडींगवरून रेल्वेद्वारे राज्यातील वीज प्रकल्पांना पाठविला जातो. कोळसा येथून परराज्यातही जातो. अनेक वीज निर्मिती प्रकल्पांनाही हा कोळसा पुरविला जातो. मात्र वणी परिसरात अद्याप एकही वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला नाही. वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, हेच जनतेला कळत नाही. तालुक्यात दोन मोठ्या व दोन लहान, अशा चार नद्या आहेत. शिवाय इतर नाले आहेत. कोळसा खाणींतूनही भरपूर पाणी बाहेर फेकले जाते. नद्यांवर धरणे बांधण्यात आली, तर वीज निर्मिती प्रकल्पांना लागणारे पाणीही मुबलक आणि सहज उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी वर्धा आणि पैनगंगा या दोन मोठ्या नद्यांचे पाणी अडविणे गरजेचे आहे. नैसर्गिक सुबत्ता असतानाही तालुक्यात वीज प्रकल्प सुरू करण्यास प्रचंड उदासीनता दिसत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)