शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! ११ वर्षीय मुलीवर अत्याचार; एकाला अटक, तिघे फरार

By रवींद्र चांदेकर | Updated: September 17, 2022 17:42 IST

महागाव तालुक्यातील घटना, डॉक्टरांना शंका आल्याने फुटले बिंग

हिवरा संगम (यवतमाळ) : महागाव तालुक्यातील एका गावात एका युवकाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. आरोपी युवकाला इतर तिघांनी सहकार्य केले. या प्रकरणी चौघांविरुद्ध महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.महागाव तालुक्यातील हिवरा संगम परिसरातील एका गावात सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली.

आरोपी युवक यशवंत इंदल आडे (२२) याने मुलीला काही कामानिमित्त आपल्या घरी बोलावले. त्यावेळी यशवंतसोबत अजय इंदल आडे (१८), अरुण विजय पवार (२०) आणि एक १५ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त पाहुणा उपस्थित होता. यशवंतने चिमुरडीचा हात धरून तिला घरात ओढत नेले. इतर तिघांनी बाहेरून दरवाजा लावला. घरात यशवंतने जबरीने मुलीवर अत्याचार केला. ही गोष्ट कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान घाबरलेल्या चिमुकलीने घरी कुणालाच काही सांगितले नाही. मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे पालकांनी तिला प्रथम हिवरा येथे व नंतर पुसदच्या डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांना वेगळीच शंका आली. त्यामुळे त्यांनी चिमुरडीच्या पालकांना विश्वासात घेवून तिच्या तब्येतीविषयी विचारण्याचा सल्ला दिला. त्यानंतर चिमुरडीसह पालक घरी परतले.

गेल्या चार-पाच दिवसांपासून ती काहीही खात नसल्याने पालकांनी तिला मांत्रिकाकडेसुद्धा नेले. मात्र चिमुरडी सतत घाबरलेल्या अवस्थेत होती. अखेरीस शुक्रवारी तिने आईला रडतच आपबिती कथन केली. त्यावेळी तिच्या आई-वडिलांना धक्का बसला. त्यांनी तातडीने महागाव पोलीस ठाणे गाठले. तेथे चौघांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंवि ३७६, १०९, बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४/६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.एकाला अटक, तिघे फरार

पोलिसांनी गुन्हा दाखल करताच शनिवारी तपासचक्रे फिरविली. चौघांपैकी एक आरोपी अरुण विजय पवार (२०) याला नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लांजी येथून अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी यशवंत इंदल आडे, अजय इंदल आडे आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अद्याप फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणMolestationविनयभंग