शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

24 तासात 1082 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 102 नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 6:26 PM

चार जणांचा मृत्यु ; 54 जणांना सुट्टी

यवतमाळ: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा वेग मंदावला असून निगेटिव्ह असणा-यांची संख्या वाढत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी गत 24 तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर 102 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 62 व 60 वर्षीय पुरुष आणि 69 वर्षीय महिला तसेच दारव्हा तालुक्यातील 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 1184 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 102 नव्याने पॉझेटिव्ह तर 1082 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 473 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9338 झाली आहे. आज (दि.16) 54 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8399 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 297 मृत्युची नोंद आहे.  जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 84059 नमुने पाठविले असून यापैकी 83234 प्राप्त तर 825 अप्राप्त आहेत. तसेच 73896 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस