पहिल्या लोकसभेचे 104 वर्षीय साक्षीदार पुखराज बोथरा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 16:19 IST2020-01-04T16:17:07+5:302020-01-04T16:19:02+5:30
पहिली लोकसभा आणि विधानसभा ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

पहिल्या लोकसभेचे 104 वर्षीय साक्षीदार पुखराज बोथरा यांचे निधन
राळेगाव (यवतमाळ) - शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तसेच पहिल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे साक्षीदार (मतदार) पुखराज उमीचंद बोथरा यांचे शनिवारी (4 जानेवारी) पहाटे निधन झाले. बोथरा 104 वर्षांचे होते.
स्वातंत्र्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्वच निवडणुकीत मतदान केले. आज तागायत झालेल्या पहिली लोकसभा आणि विधानसभा ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिले लोकसभेचे साक्षीदार म्हणून राळेगाव निवडणूक विभागाच्या वतीने त्यांचा मतदानाच्या वेळी सत्कार करण्यात आला होता. महात्मा गांधींची आंदोलने व स्वातंत्र्याच्या चळवळी विद्यार्थीदशेत असताना त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या.
बोथरा यांच्या मागे विमलबाई संचेती, रेखाताई कोठारी या दोन मुली, भागचंद, कांतीलाल व दिनेश ही तीन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. राळेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील गणमान्य नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.