WWE stars Danny Havoc dead at 45: before months his wife died of heart failure svg | WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन

WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन

कोरोना व्हायरसच्या संकटात जगात तणावाचं वातावरण असताना क्रीडा वर्तुळाला एक मोठा धक्का बसला आहे. WWE स्टार कुस्तीपटू डॅनी हॅव्हॉक याचं वयाच्या 45 वर्षी निधन झाले. दोन महिन्यांपूर्वी 4 एप्रिलला त्याची पत्नी ब्रायनी मोरोव्ह हिचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. डॅनी हॅव्हॉक याच खरं नाव ग्रँट बेर्कलँड हे आहे. WWEतील अन्य खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली आहे. 2017मध्ये हॅव्हॉकनं निवृत्ती घेतली होती.

2008मध्ये त्यानं कुस्तीत पदार्पण केलं. 17 मे 2008 मध्ये त्यानं Tournament of Death या स्पर्धेत पदार्पण करताना धमाका उडवला होता. 2011मध्ये त्यानं गतविजेत्या ज्यून कसाईला पराभूत करून जेतेपदही नावावर केलं होतं. त्याला पाहूनच हॅव्हॉकनं या खेळाची निवड केली होती. त्याच्या निधनाचं कारण अद्याप कळलेलं नाही.


Web Title: WWE stars Danny Havoc dead at 45: before months his wife died of heart failure svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.