शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:21 IST

Israel - Iran War, America attack on Iran: मध्य पूर्वेमध्ये तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिका एका मुस्लिम राष्ट्रावर हल्ला करत आहेत, यामुळे मुस्लिम देशही संतापलेले आहेत.

रेसलिंग स्पर्धा घेणारी डब्ल्यूडब्ल्यूई भलत्याच हट्टाला पेटली आहे. इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका युद्धाच्या सावटाखाली काहीही झाले तरी त्यांना नाईट ऑफ चॅम्पिअन्स स्पर्धा सौदी अरेबियामध्येच घ्यायची आहे. येत्या २८ जूनला ही स्पर्धा रिदायच्या एरिनामध्ये खेळविली जाणार आहे. एवढेच नाही तर डब्ल्यूडब्ल्यूई स्मॅकडाऊनचा इव्हेंटही एरिनामध्येच २७ जूनला घेतला जाणार आहे. 

मध्य पूर्वेमध्ये तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिका एका मुस्लिम राष्ट्रावर हल्ला करत आहेत, यामुळे मुस्लिम देशही संतापलेले आहेत. यामुळे अनेक लोकांनी या भागात होणारा WWE चा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर युके सरकारने या देशांत प्रवास करण्याचे टाळण्याचे देखील सांगितलेले आहे. तरी देखील डब्ल्यू डब्ल्यू ई आपल्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार पुढे जात आहे. 

कंपनीनुसार ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सौदीमध्येच आधीच्या नियोजनानुसार कार्यक्रम होणार आहे. अमेरिकेने आपला विश्वासघात केल्याचे म्हणणे इराणचे आहे. अमेरिकेने १५ दिवसांची मुदत दिलेली होती, परंतू दोनच दिवसांनी हल्ले चढविले. त्यापूर्वी अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा सुरु असताना इस्रायलने हल्ले चढविले होते. यामुळे आता इराण दोन्ही देशांना कायमचा धडा शिकविण्याची भाषा करत आहे. सौदी अरेबिया इस्रायल आणि इराणच्या आसपास आहे. यामुळे तिथे विमानांनी जाणे आणि कार्यक्रम घेणे खूप जोखमीचे आहे. WWE चे आंतरराष्ट्रीय स्तरावरील चाहते देखील या स्पर्धेला येणार आहेत. मिसाईल हल्ल्यांमुळे विमाने पाडली जाण्याची भीती देखील आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेही आपल्या नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ब्रिटन सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियाला न जाण्याचा सल्ला दिला आहे.

WWE नुसार ही स्पर्धा स्थगित किंवा रद्द केली जाणार नाही. कारण रॉयल रंबल कार्यक्रम देखील २०२६ मध्ये सौदी अरेबियामध्येच होणार आहे. सौदी अरेबिया जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ईIranइराणIsraelइस्रायलsaudi arabiaसौदी अरेबियाAmericaअमेरिका