मनमाड(नाशिक): सामाजिक अखंडता अबाधित राखण्यासाठी अमन शांती मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 17:54 IST2017-08-13T17:54:24+5:302017-08-13T17:54:24+5:30
मनमाड (नाशिक), दि. 13 - आगामी काळात गणेशोत्सव व बकरी ईद एकाच वेळी येत आहे याचे निमित्त साधून काही ...
मनमाड (नाशिक), दि. 13 - आगामी काळात गणेशोत्सव व बकरी ईद एकाच वेळी येत आहे याचे निमित्त साधून काही समाज कंटक सोशल मिडीयाच्या माध्यमातून अथवा वेगवेगळ्या मार्गाने अफवा पसरवून शांतता बिघडविण्याचे काम करण्याची दाट शक्यता असते. समाज कंटकाचे मनसुबे उधळून लावण्यासाठी व सामाजिक अखंडता राखण्यासाठी शहरात आज अमन-शांती मार्चचे आयोजन करण्यात आले. सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मार्च ची सांगता एकात्मता चौकात करण्यात आली.