कोल्हापूर : हौसेखातर हजारो रुपये खर्च करून तयार केलेल्या आकर्षक सजावटीच्या रिक्षा शनिवारी कोल्हापुरात पाहायला मिळाल्या. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर , सांगली, सातारा, बेळगाव, पंढरपूर, पुणे येथील रिक्षा सहभागी झाल्या होत्या.