शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या उपस्थितीबाबत जि.प.च्या मार्गदर्शक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 12:05 IST

Washim ZP News : वाशिम जि. प. शिक्षण विभागानेही शिक्षकांच्या उपस्थितीबाबत १७ जूनरोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  कोरोना काळात शैक्षणिक कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शिक्षकांसाठीशाळा सुरू होणार आहेत. या सत्रात कोणत्या वर्गाच्या किती शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबत शिक्षण विभागाने १४ जूनरोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर वाशिम जि. प. शिक्षण विभागानेही शिक्षकांच्या उपस्थितीबाबत १७ जूनरोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना तसे पत्रही दिले आहे.वाशिमसह विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २७ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जारी केली आहे. त्यानुसार शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू होणार आहे. या सत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार नसली, तरी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, दहावी व बारावीच्या निकालाकरिता  मूल्यांकन करणे आदी कामांसाठी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. कोणत्या वर्गाच्या किती शिक्षकांनी उपस्थित राहावे, याबाबत १४ जूनरोजी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानंतर जि. प. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वाशिम जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या उपस्थितीबाबत १७ जूनला पत्र काढण्यात आले असून, कोविड-१९ परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत शाळा बंद असल्या, तरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील, याची दक्षता सर्व शाळा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही शाळांना दिल्या आहेत. 

 

असे असेल शिक्षक, शिक्षकेतरांच्या उपस्थितीचे प्रमाण

इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे ५० टक्के, तर दहावी व बारावीच्या १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असेल.शिक्षकेतरांची उपस्थिती १०० टक्के अनिवार्य असेल.प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असेल, 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदTeacherशिक्षकSchoolशाळा