जि.प. अध्यक्षांनी घेतला विकासकामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:36 IST2021-01-18T04:36:36+5:302021-01-18T04:36:36+5:30

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून जिल्ह्यात विविध गावांत विकासकामे केली जात आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे या कामांचा आढावा ...

Z.P. The President reviewed the development work | जि.प. अध्यक्षांनी घेतला विकासकामांचा आढावा

जि.प. अध्यक्षांनी घेतला विकासकामांचा आढावा

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून जिल्ह्यात विविध गावांत विकासकामे केली जात आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे या कामांचा आढावा वारंवार घेत आहेत. या अंतर्गत त्यांनी शनिवारी आसेगाव सर्कलमधील गावांना शनिवारी भेटी देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामांची पाहणी केली. दाभडी येथील राघोजी संस्थानमध्ये दर्शन घेत त्यांनी विविध गावांतील ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. यात काही गावांत नळयोजनेसह जिल्हा परिषदेच्या शाळांतील खोल्यांसह इतर कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सरपंच नंदकिशोर महल्ले, पोलीस पाटील मनोज महल्ले, जनार्दन जाधव, गणेश महल्ले, अतुल ठाकरे, शुभम महल्ले, सागर पाटील, भागवत महल्ले, ग्रामपंचायत सदस्य देवराव दुकानदार, सुभाष महल्ले, संजय ठाकरे, ज्योतिराम राठोड आणि समाधान भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.

===Photopath===

170121\17wsm_3_17012021_35.jpg

===Caption===

जि.प. अध्यक्षांनी घेतला विकास कामांचा आढावा

Web Title: Z.P. The President reviewed the development work