जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष आज पदभार स्वीकारणार!

By Admin | Updated: July 5, 2016 00:50 IST2016-07-05T00:50:12+5:302016-07-05T00:50:12+5:30

जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पार पडणार पदग्रहण सोहळा.

Zip Chairman-vice president will take charge today! | जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष आज पदभार स्वीकारणार!

जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष आज पदभार स्वीकारणार!

वाशिम : २९ जुलै रोजी वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून हर्षदा दिलीप देशमुख तर उपाध्यक्ष म्हणून चंद्रकांत सुभाष ठाकरे यांची निवड झाली असून, सोमवार ५ जुलै रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्विकारल्यानंतर लवकरच विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. ३0 जून रोजी अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांंंसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी २९ जुलैला निवडणूक घेण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षदा देशमुख या ५ जुलै रोजी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात ५ जुलै रोजी दुपारी १२.३0 वाजता हा पदग्रहण सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Web Title: Zip Chairman-vice president will take charge today!