शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदासंदर्भात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी उपसले उपोषणाचे हत्यार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:35 IST

Washim ZP News जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व सदस्य हे ऐन दिवाळीदरम्यान उपोषण आंदोलन छेडणार आहेत. 

वाशिम : जिल्हा परिषदेतील वर्ग एक व दोन दर्जाची ६४ पदे रिक्त असतानाही, ही पदे भरण्याबाबत शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व सदस्य हे ऐन दिवाळीदरम्यान उपोषण आंदोलन छेडणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यानंतर राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढल्या. त्यापैकी वाशिम जि.प. वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. राज्यात आणि जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता आहे; परंतू, रिक्त पदे भरण्यासंदर्भात राज्य शासनाने वाशिम जिल्हा परिषदेकडे जणू पाठच फिरविली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांचा अपवाद वगळता अजूनही जिल्हा परिषदेत वर्ग एक व दोन दर्जाची ६४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे यापूर्वीच मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजिता पवार यांच्याकडेही मागणी केली. परंतू, यावर कोणतीच ठोस कार्यवाही नसल्याने रिक्त पदांचा तिढा कायम आहे. रिक्त पदांमुळे जिल्हा परिषदेंतर्गतची विकास कामे ठप्प आहेत. एरवी आंदोलने, मोर्चे काढून सरकारविरोधात दंड थोपाटणारा विरोधी पक्षदेखील याबाबत फारसा गंभीर नसल्याचे दिसून येते. रिक्त पदांचा तिढा सोडविण्यासाठी शेवटी जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व सदस्य एकवटले असून, दिवाळीपूर्वी रिक्त पदे न भरल्यास आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. त्यानुसार धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, नरक चतुर्दशीच्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे तर भाऊबीजच्या दिवशी थेट मंत्रालयासमोर मुंबई या ठिकाणी उपोषण आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद