शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीचे शिवसेनेसोबत सूत जुळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:10 IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिवसेनेसोबत मनोमिलन झाले नसून, एकत्र निवडणूक लढण्यासंबंधी दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अवघ्या २७ दिवसांवर येऊन ठेपली असताना ही निवडणूक सोबत लढायची किंवा स्वतंत्र, याबाबत महाविकास आघाडीने कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर केलेले नाही. दुसरीकडे स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिवसेनेसोबत मनोमिलन झाले नसून, एकत्र निवडणूक लढण्यासंबंधी दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.हिंदुत्वाच्या मुद्यावर सुरूवातीपासूनच हातात हात घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूकीस सामोरे गेलेल्या भाजपा आणि शिवसेनेचे चालूवर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर मात्र मुख्यमंत्री पदावरून बिनसले आणि युती संपुष्टात आली. शिवसेनेने भाजपासोबत असलेले राजकीय संबंध तोडत महाराष्ट्र विकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. दरम्यान, सत्तेसाठी झालेल्या या राजकीय उलथापालथीचे परिणाम जिल्ह्यातील राजकारणावरही झाले असून तोंडावर असलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महाविकास आघाडी सोबत लढणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी निवडणूक अवघ्या २७ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कुठलेही ठोस धोरण जाहीर झाले नसल्याने तीन्ही पक्षांमधील स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुरते संभ्रमात सापडले आहेत.गतवेळच्या वाशिम जिल्हा परिषद निवडणूकीत काँग्रेसने ५२ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता; तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळविला होता. ठरल्यानुसार काँग्रेसने सलग पाच वर्षे अध्यक्षपद; तर राष्ट्रवादीने उपाध्यक्षपद उपभोगले. अवघ्या काही दिवसानंतर पुन्हा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीसाठी या दोन्ही पक्षांनी रणनिती आखली आहे; मात्र बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूकीस सामोरे जावे लागणार आहे. एवढेच नव्हे; तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये सेनेने दावा ठोकल्यास मित्रत्वाखातर काही सर्कलही सेनेसाठी सोडावे लागतील. परिणामी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हाच मुद्दा काँग्रेस, राष्ट्रवादीतील स्थानिकच्या काही नेतेमंडळींना चांगलाच खटकत असून महाविकास आघाडीने सोबत निवडणूक लढण्याबाबत सद्यातरी दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.

पक्षश्रेष्ठीकडून सद्यातरी एकत्रीत निवडणूक लढण्याचा निरोप मिळालेला नाही; मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काँग्रेस निवडणूकीला सामोरे जाईल.- दिलीप सरनाईकजिल्हाध्यक्ष, काँग्रेस

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीला स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. त्यानुषंगाने नियोजन केले जात आहे. अशात काँग्रेस आणि शिवसेनेसोबत एकत्रीत निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास तडजोड करून राष्ट्रवादी काँग्रेसची त्यासाठी देखील तयारी असेन.- चंद्रकांत ठाकरेजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

महाविकास आघाडीच्या नावाखाली राज्यात सत्तास्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आगामी जि.प., पं.स. निवडणूकाही सोबत लढाव्यात, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. असा काही निर्णय झाल्यास जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निश्चितपणे विरोध नसणार.- सुरेश मापारीजिल्हाप्रमुख, शिवसेना

 

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारणWashim ZPवाशीम जिल्हा परिषदShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस