जाजू रूग्णालयाची झाडाझडती

By Admin | Updated: July 30, 2014 00:22 IST2014-07-30T00:22:50+5:302014-07-30T00:22:50+5:30

जिल्हा शल्यचिकीत्सकांनी केली पाहणी:रूग्णालय सिल

ZaZZZDATI of Jeju Hospital | जाजू रूग्णालयाची झाडाझडती

जाजू रूग्णालयाची झाडाझडती

वाशिम : मालेगाव येथील जूून्या बसस्थानकानजीक असलेल्या डॉ. जाजू यांच्या हॉस्पीटलची २९ जूलै रोजी आरोग्य, महसुल व पोलिस विभागाच्यावतीने झाडाझडती घेण्यात आली. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जांभरुणकर, मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मनोहर, तालुका आरोग्य अधिकारी एस. बोरसे, मालेगावचे तहसीलदार रवि काळे, ठाणेदार आर. तट आदिंच्या चमुने ही झाडाझडती घेतली. मालेगावातीलच एक गर्भवती महिला डॉ. जाजू यांच्या दवाखान्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर सदर महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉ. जाजू यांचे हॉस्पीटल सिल केले होते. हॉस्पीटलचे प्रवेशद्वार व आतील एक खोली सील केली असली तरी डॉ. जाजू यांच्याविरुध्द कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. घटनेनंतर आज तिसर्‍या दिवशी उपरोक्त आरोग्य, महसुल व पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाने २९ जूलै रोजी डॉ. जाजू यांच्या दवाखान्यात सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान झाडाझडती घेतली. यात कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दूपारी ४ वाजताच्या सुमारास डॉ. जाजू यांच्या पत्नीचाही बयाण नोंदविल्याची माहिती पोलिसांनी दिली. झालेल्या झाडाझडतीत पोलिसांना काही हाती लागले का याची सविस्तर माहिती मात्र मिळू शकली नाही. ही माहिती अत्यंत गोपनीय असून सर्वत्र खळबळ उडविणारे हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: ZaZZZDATI of Jeju Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.