पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: August 18, 2016 02:15 IST2016-08-18T02:15:31+5:302016-08-18T02:15:31+5:30

वाशिम जिल्ह्यातील जांभरुण नावजी येथील घटना.

The youth who went to swimming swept away | पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

वाशिम, दि. १७ : विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या ३0 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील जांभरुण नावजी येथील शेतशिवारात बुधवारी सायंकाळी घडली.
वाशिम तालुक्यातील जांभरुण नावजी येथील दीपक प्रल्हाद थोरात नामक युवक शेतशिवारातील विहिरीमध्ये गुरुवारी पोहण्यासाठी गेला होता. विहिरीतील लोखंडी अँगलवर डोके आदळल्याने तो बेशुद्ध होऊन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रात्री ११.३0 वाजता आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Web Title: The youth who went to swimming swept away