रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:00 IST2017-10-07T02:00:13+5:302017-10-07T02:00:49+5:30
वाशिम: येथून अकोलाकडे जाणार्या हैद्राबाद-अकोला इंटरसिटी एक्सप्रेसखाली उडी घेवून साहिल नरेंद्र वानखेडे या युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या!
ठळक मुद्देसाहिल नरेंद्र वानखेडे या युवकाने हैद्राबाद-अकोला इंटरसिटी एक्सप्रेसखाली उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: येथून अकोलाकडे जाणार्या हैद्राबाद-अकोला इंटरसिटी एक्सप्रेसखाली उडी घेवून साहिल नरेंद्र वानखेडे या युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, अकोलाकडे जाणारी इंटरसिटी वाशिम रेल्वेस्थानकावरून सुटल्यानंतर ११४ क्रमांकाच्या चिखली रेल्वेगेटजवळ सदर युवक रेल्वेखाली येवून मृत्यूमुखी पडला. तो वाशिम येथील लाखाळा परिसरात वास्तव्याला होता. तसेच फायनान्स कंपनीत काम करित होता, अशी माहिती प्राप्त झाली. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.