विष प्राशन करून युवकाची आत्महत्या!
By Admin | Updated: April 12, 2017 20:37 IST2017-04-12T20:37:53+5:302017-04-12T20:37:53+5:30
मेडशी (वाशिम): चोंढी या गावाकडे जाणा-या मार्गावर बुधवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ११.३0 वाजता एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

विष प्राशन करून युवकाची आत्महत्या!
मेडशी (जि.वाशिम) : येथून चोंंढी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १२ एप्रिल रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोंढी येथील रहिवासी योगेश सुदाम ठाक रे या युवकाचे प्रेत मेडशी-चोंढी रस्त्यावर १२ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता आढळून आले. घटनास्थळी एम.एच.३० ए.एस.२३३ या क्रमांकाची दुचाकी उभी होती. पोलिस तपासांत घटनास्थळाहून मेडशीकडे येणाऱ्या रस्त्यावर विषारी औषधीचा डबा आढळला. सदर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगावच्या रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिस कार्यवाही सुरु होती.