युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: April 30, 2015 01:46 IST2015-04-30T01:46:40+5:302015-04-30T01:46:40+5:30
२४ वर्षीय युवकाने प्राशले विषारी औषध.

युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
रिसोड (जि. वाशिम) : तालुक्यातील ग्राम लोणी येथील एका २४ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २९ एप्रिल रोजी घडली. रिसोड तालुक्यातील ग्राम लोणी येथील संतोष साबळे या युवकाने गावात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्याने त्याला रिसोड ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाने प्रा थमिक उपचार करीत पुढील उपचारासाठी वाशिम येथे पाठविले आहे. सदर युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.