पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता!

By Admin | Updated: September 2, 2016 01:16 IST2016-09-02T01:16:16+5:302016-09-02T01:16:16+5:30

मालेगाव तालुक्यातील घटना; केळी धरणात पोहण्यासाठी गेला होता युवक.

Youth missing for swimming! | पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता!

पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता!

मालेगाव (जि. वाशिम), दि. १: येथून जवळच असलेल्या केळी धरणात पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता झाला. ही घटना गुरूवार, १ सप्टेबर रोजी घडली.
अमोल प्रल्हाद साखरे (वय २८ वर्षे) हा युवक गुरूवारी दुपारी पोहण्यासाठी केळी धरणातील खोल पाण्यात शिरला. मात्र तो बराच वेळ बाहेर आला नाही. यामुळे परिसरातील काही युवकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. तहसीलदार आर.बी. जस्वत यांनी भेट दिली. २ सप्टेंबरच्या सकाळपर्यंंत शोध न लागल्यास विशेष पथकास पाचारण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पोलिस तपास सुरू होता.

Web Title: Youth missing for swimming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.