मळणी यंत्रात अडकल्याने युवक ठार
By Admin | Updated: March 20, 2017 03:00 IST2017-03-19T20:59:25+5:302017-03-20T03:00:28+5:30
मळणी यंत्रात पडल्याने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वाढा फार्म शिवारात घडली.

मळणी यंत्रात अडकल्याने युवक ठार
मंगरुळपीर ( वाशीम ) : शेतात हरभरा काढत असताना तोल जाऊन मळणी यंत्रात पडल्याने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वाढा फार्म शिवारात घडली. कैलास अनंता आंबेकर असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांक डून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी शंकर अनंता आंबेकर रा. वाढा फार्म (२२) याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे, की १९ मार्च रोजी वाढा फार्म येथे सचिन परळीकर यांचे शेतात मृतक कैलास अनंता आंबेकर (१९) हा हरभरा काढत असताना तोल जाऊन मळणी यंत्रावर पडला. त्यामुळे मळणी यंत्रात अडकून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.