देशी पिस्टल बाळगणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात; ‘एलसीबी’ची कारवाई, गुन्हा दाखल
By सुनील काकडे | Updated: February 2, 2024 19:17 IST2024-02-02T19:17:43+5:302024-02-02T19:17:52+5:30
त्याचा कुठलाही परवाना मात्र त्याच्याकडे नसल्याचे सिद्ध झाले.

देशी पिस्टल बाळगणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात; ‘एलसीबी’ची कारवाई, गुन्हा दाखल
वाशिम : विनापरवाना जवळ देशी बनावटीची पिस्टल आणि मॅगझिन बाळगणाऱ्या २९ वर्षीय युवकास पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी अटक केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये संबंधितावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
वाशिम तालुक्यातील ग्राम मोहगव्हाण, येथील नितीन बबन दंदे (२९) हा युवक देशी बनावटीची पिस्टल विनापरवाना बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यानुषंगाने पंचासह नमूद ठिकाणी जाऊन आरोपिस ताब्यात घेण्यात आले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता कमरेला एक सिल्व्हर रंगाची तथा देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह आढळून आली. त्याचा कुठलाही परवाना मात्र त्याच्याकडे नसल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये नमूद आरोपिवर कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एलसीबीचे पीआय रामकृष्ण महल्ले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.