शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

भारिप-बमसंचे युसूफ पुंजाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 2:39 PM

भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान महासचिव युसूफ पुंजाणी पक्षांतर्गत धोरणांप्रती नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून प्राप्त झाली.

- प्रफुल्ल बानगावकर लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: नगर परिषदेच्या निवडणुकीपासून राजकारण सुरू करून गत विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान महासचिव युसूफ पुंजाणी पक्षांतर्गत धोरणांप्रती नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून प्राप्त झाली.युसूफ पुंजाणी यांनी कारंजा व मानोरा नगर परिषदेमध्ये भारिप-बमसंची सत्ता स्थापन केली. तसेच मंगरूळपीर येथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्यात मोलाची भूमिका निभावली; तर वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अल्पशा मताने पराभूत झाला. गेल्या अनेक वर्षात भारिप-बमंसचे जिल्ह्यात अस्तित्व नव्हते. ते गतवेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर उभारून आले. त्यामुळेच अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुंजाणी यांना बहाल केलेले प्रदेश महासचिव पद, जिल्हाध्यक्षपदाचे अधिकारही कुचकामी ठरले. दरम्यान, गत चार वर्षात पक्षांतर्गत होणारी घुसमट, अनुशासनाची उणिव आणि स्वपक्षातीलच काही नगरसेवकांनी वेळोवेळी केलेले बंड व त्यावर पक्ष नेतृत्वाने घेतलेली बघ्याची भूमिका, याप्रती युसूफ पुंजाणी नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री सुभाष ठाकरे व चंद्रकांत ठाकरे यांनी संपर्क साधल्याने पुंजाणी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू आहे.उमेदवारी जाहीर न करता झाल्या इच्छुकांच्या मुलाखतीआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ यांची उमेदवारी पक्षाने औरंगाबाद विधानसभा मतदार संघाकरिता जाहीर केली. त्या धर्तीवर कारंजा-मानोरा मतदार संघासाठी पुंजाणी यांची उमेदवारी जाहीर करणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता काही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही बाब पुंजाणी व समर्थकांना खटकली आहे.

काँग्रेस, रा.काँ.कडून आॅफरभारिप-बमसंचे पक्षप्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास नकार दिल्याने दोन्ही पक्षांकडून युसूफ पुंजाणी यांना आपापल्या पक्षात समाविष्ट करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

मी सद्य:स्थितीत भारिप-बहुजन महासंघाच्या प्रदेश महासचिवपदी कायम असून अन्य काही राजकीय पक्षांमधील नेतेमंडळी माझ्या संपर्कात आहे; मात्र मी पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे.- युसूफ पुंजाणी, कारंजा लाड

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारणBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघNCPराष्ट्रवादी काँग्रेस