मालेगाव येथे जुगार अड्डय़ावर धाड
By Admin | Updated: May 23, 2016 01:23 IST2016-05-23T01:23:39+5:302016-05-23T01:23:39+5:30
१३ जणांवर कारवाई; २८ हजारांचा ऐवज जप्त
_ns.jpg)
मालेगाव येथे जुगार अड्डय़ावर धाड
मालेगाव (जि. वाशिम): शहरातील एका हॉटेलच्या वर जुगार खेळत असतानाची माहिती प्राप्त झाल्यावरून पोलिसांनी धाड टाकली असता १३ जण जुगार खेळताना आढळून आल्याची घटना २२ मे रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली.
वाशिम-अकोला महामार्गावरील हॉटेल मराठा वाइन बारच्या वर जुगार सुरूअसल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथे काशिराम मगर यांच्यासह १३ जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून २८ हजार ३१0 रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच जुगार खेळणार्या १३ जणांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर कारवाई ठाणेदार नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलिसांनी केली.