कृषी विज्ञान केंद्राद्वारे जागतिक जल दिन २०२१ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:39 IST2021-03-25T04:39:52+5:302021-03-25T04:39:52+5:30
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जल दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील ...

कृषी विज्ञान केंद्राद्वारे जागतिक जल दिन २०२१ साजरा
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जल दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील दिलीप गायकवाड व महादेव नारायण चोंडकर, तसेच मार्गदर्शक म्हणून एस. के. देशमुख कृषी विस्तारतज्ज्ञ, टी. एस. देशमुख कृषिविद्या तज्ज्ञांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एस. के. देशमुख यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे फायदेशीर उत्पादक वापर याविषयी सखोल विवेचन करून जल संसाधनविषयी जागरूकता वाढविली. त्यांनी पाण्याची उपलब्धता, जलसंधारण तसेच पीक नियोजनात पाण्याच्या कार्यक्षम वापराबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तदनंतर उन्हाळी पीक विशेषता भुईमूग व मूग या पिकांच्या सद्यस्थिती नियोजनाच्या दृष्टीने व्यवस्थापनाची दिशा व ओलित व्यवस्थापनासाठी सूक्ष्म सिंचन, स्प्रींकलर पद्धती वापर यावरील माहिती दिली. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे शंका निरसन तज्ज्ञांनी केले. कार्यक्रमास किनखेडा, मैराळडोह, एरंडा येथील शेतकरी व शेतकरी गटाच्या सभासदांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल धाबे यांनी केले.