जागतिक चिमणी दिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:19+5:302021-03-22T04:37:19+5:30
कार्यक्रमाकरिता वनरक्षक श्रीनिवास भिसडे, सामाजिक वनीकरण विभाग रिसोडचे भुजंगराव सरनाईक, प्रभारी मुख्याध्यापक मदन चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाशी ...

जागतिक चिमणी दिनानिमित्त कार्यक्रम
कार्यक्रमाकरिता वनरक्षक श्रीनिवास भिसडे, सामाजिक वनीकरण विभाग रिसोडचे भुजंगराव सरनाईक, प्रभारी मुख्याध्यापक मदन चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाशी समन्वय साधत गजानन मुलंगे यांनी पर्यावरण संतुलनाच्या दृष्टिकोनातून मानव जेवढा महत्त्वाचा त्याचप्रमाणे इतर पशुपक्षीसुद्धा महत्त्वाचे आहेत. पण दिवसागणिक वाढते वायुप्रदूषण जलप्रदूषण, शेतामध्ये फवारली जाणारी विषारी कीटकनाशके, तसेच वाढते तापमान यामुळे अनेक पक्ष्यांच्या जाती नष्ट झाल्या आहेत आणि काही उर्वरित नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत हे निश्चित.. त्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या रसवंती, हॉटेल, त्याचप्रमाणे घरासमोर असणाऱ्या झाडांना किमान एक तरी पाणवठा बांधून पक्ष्यांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबन चोपडे, बद्री नालेगावकर, काजल पवार, गफार भाई, देवाने गायकवाड, इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.