मजुरांनी आधार लिंक खात्याची माहिती सादर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:37 AM2021-01-21T04:37:03+5:302021-01-21T04:37:03+5:30

ज्या मजुरांचे खाते काही तांत्रिक कारणास्तव बंद पडले असेल, त्यांनी ते खाते बँकेशी संपर्क साधून सुरु करावे अथवा नवीन ...

Workers should submit Aadhaar Link account information | मजुरांनी आधार लिंक खात्याची माहिती सादर करावी

मजुरांनी आधार लिंक खात्याची माहिती सादर करावी

Next

ज्या मजुरांचे खाते काही तांत्रिक कारणास्तव बंद पडले असेल, त्यांनी ते खाते बँकेशी संपर्क साधून सुरु करावे अथवा नवीन खाते उघडावे किंवा चालू असलेल्या बँक खात्याची माहिती सुद्धा तहसील अथवा पंचायत समिती कार्यालयात तात्काळ द्यावी. या योजनेंतर्गत आधार आधारित मजुरीचे प्रदान होत असल्याने ज्या मजुरांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार क्रमांक जोडलेला नाही, त्यांनी संबंधित बँकेत जाऊन आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून घ्यावा व त्याची माहिती पंचायत समिती कार्यालयास द्यावी.

ज्या मजुरांना त्यांचे नवीन खाते उघडायचे आहे, अशा मजुरांना इंडियन पोस्ट पेमेंटस बँक (आयपीपीबी) या पोस्ट विभागाच्या बँक खात्यातून आपले नवीन बँक खाते उघडता येईल. त्यामुळे त्यांना सदरची मजुरी गावातच रोखीने मिळविता येईल. अशा खात्याची माहिती सुद्धा संबंधितांनी तालुक्याचे तहसील किंवा पंचायत समिती कार्यालयास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मजुरांनी आपल्या आधार कार्डची छायांकित प्रत व मोबाईल क्रमांक गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे रोहयो शाखेत द्यावा. मजुरांकडून या सर्व बाबींविषयी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांची प्रलंबित असलेली मजुरीचे प्रदान वेळेत होण्यास मदत होईल, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.

Web Title: Workers should submit Aadhaar Link account information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.