महिला प्रसाधनगृहाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST2021-09-04T04:48:53+5:302021-09-04T04:48:53+5:30
सदर काम सुरू होऊन जवळपास दोन वर्षे होत असून सुद्धा सदर बांधकाम पूर्ण होत नसल्याने याबाबत नगरपंचायतच्या बांधकाम विभागाने ...

महिला प्रसाधनगृहाचे काम रखडले
सदर काम सुरू होऊन जवळपास दोन वर्षे होत असून सुद्धा सदर बांधकाम पूर्ण होत नसल्याने याबाबत नगरपंचायतच्या बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला ३ मार्च २०१९ व १९ सप्टेंबर २०२० ला एक नोटीस दिली होती. त्या दोन्ही नोटिसीला सुद्धा संबंधित कंत्राटदाराने राजकीय पाठबळाच्या जोरावर नगरपंचायतला कोणतेही उत्तर न देता केराची टोपली दाखविली . तरीसुद्धा नगरपंचायत बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला विरुद्ध अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने नगरपंचायतच्या बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सदर बांधकाम कोणत्याही अभियंत्यांमार्फत वा प्रगत कारागीर मार्फत न मजुरांकडून अत्यंत थातूरमातूर व निकृष्ट दर्जाचे हाेत आहे. कामातही अनियमितता आहे. सदर कामाचे निष्पक्ष चौकशी व्हावी व सदर काम पाडून नव्याने सुरू करावे व सदर कामाची खर्च संबंधित कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई म्हणून घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे
020921\5440img_20210902_143314.jpg
रखडले