अंदाजपत्रकाला बगल देत विहिरीचे काम
By Admin | Updated: July 7, 2014 23:45 IST2014-07-07T23:45:38+5:302014-07-07T23:45:38+5:30
४0 फुटाऐवजी ३0 फुट विहिरीची खोली

अंदाजपत्रकाला बगल देत विहिरीचे काम
पांडवउमरा : जिल्हा परिषद वाशिम मार्फत तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत पांडव संस्थान पांडवउमरा येथे चार लक्ष रुपये किमतीच्या विहीरीचे बांधकाम अंदाजपत्रकाला बगल देउन काम पुर्णत्वाकडे नेले जात असून ते अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात यावे अशी मागणी पांडवसंस्थानच्या मंडळाच्या पदाधिकार्याने केली आहे. सदर विहीरीचे खोदकाम जेसेबी मशीनव्दारे खोदुनसुद्धा अंदाजपत्रकाप्रमाणे खोदकाम करण्यात आले नाही . अंदाजपत्रकामध्ये खोली ४0 फुट असून प्रत्यक्षात मात्र ३0 फुटच केल्याने एक प्रकारे अंदाजपत्रकाला बगल दिल्या जात असल्यामुळे शासनाची दिशाभूल केल्या जात आहे. देवाच्या दरबारीही शासकीय योजना अंदाजपत्रकानुसार होत नाही ही बाब खेदजनक म्हणावी लागेल अशा प्रतिक्रीया भाविकामधून उमटत आहेत. या विहीरीच्या कामाची चौकशीची मागणी भाविकांनी केली होती. चौकशी काय संबंधित अभियंता हे काम चालू झाले तेंव्हापासून कामावर आलेच नसल्याचा भाविकाचा आरोप आहे .या कामावर कामासंबंधी माहिती दर्शन फलकही लावला नाही. फलक लावला असता तर कामाचे खरे स्वरुप उजेडात येत होते. या भितीनेच संबंधित कामाची माहिती दर्शक फलक लावला नसेल असे ग्रामस्थ बोलताहेत. सदर विहीरीचे बांधकाम सुरु झाले खरे पण विहीर बांधण्याकरिता मातीमिङ्म्रीत रेतीचा वापर होत असल्याने आणि बांधकामावर पाणी न टाकत असल्याचे अल्पावधितच विहीर बांधकाम खचेल असे पांडवसंस्थानवरील डिगांबर ढोबळे यांनी सांगितले. पांडव संस्थानवरील ४ लक्ष रुपये किमतीच्या विहीर बांधकामाकडे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी या कामाकडे लक्ष देउन विहीरीचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात यावे अशी मागणी पांडवसंस्थानच्या मंडळाच्या पदाधिकार्याने केली आहे.