टँकरग्रस्त गावात लोकसहभागातून झाली जलसंधारणाची कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:23 IST2017-09-03T19:23:11+5:302017-09-03T19:23:59+5:30

वाशिम : २०११ पर्यंत हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणाºया वाळकी-दोडकी या गावात २०१२ पासून लोकसहभागातून जल चळवळ सुरू झाली. २०१२ ते २०१६ या चार वर्षात लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यावर्षी पावसात सातत्य नसतानाही, दोडकी परिसरातील तलाव, नाले, विहिरींना बºयापैकी पाणी असल्याने शेतकºयांना खरिपाची पिके चांगल्या पद्धतीने जगविता आली.

Work of water conservation works from people's participation in tanker village. | टँकरग्रस्त गावात लोकसहभागातून झाली जलसंधारणाची कामे !

टँकरग्रस्त गावात लोकसहभागातून झाली जलसंधारणाची कामे !

ठळक मुद्देशेती सिंचन शक्य भूगर्भातील जलपातळीत वाढ 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : २०११ पर्यंत हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणाºया वाळकी-दोडकी या गावात २०१२ पासून लोकसहभागातून जल चळवळ सुरू झाली. २०१२ ते २०१६ या चार वर्षात लोकसहभागातून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे झाली. परिणामी, पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यावर्षी पावसात सातत्य नसतानाही, दोडकी परिसरातील तलाव, नाले, विहिरींना बºयापैकी पाणी असल्याने शेतकºयांना खरिपाची पिके चांगल्या पद्धतीने जगविता आली.
एरव्ही हिवाळ्याला सुरूवात होत नाही; तोच दोडकी येथे दरवर्षी पाणीटंचाई जाणवत होती. पाणीटंचाईच्या दाहकतेतून गावाला बाहेर काढण्यासाठी गावकºयांनी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांची मुहूर्तमेढ रोवली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष नानवटे यांनी पुढाकार घेतला. सलग चार ते पाच वर्षे जल चळवळ राबविली. जलयुक्त शिवार अभियानातही गावाचा समावेश झाला. लोकसहभाग आणि विविध स्वयंसेवी, दानशूरांच्या मदतीतून माती बंधारे, दगडी बांध, शेततळी, नाविन्यपूर्ण रिचार्ज पिट, नाला खोलीकरण, सिमेंट, गॅबियन, भूमिगत व वनराई बंधारे, फायबर सीट बंधारे आदी जलसंधारणाची कामे झाली. परिणामी शिवारात पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला व भूगर्र्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली. यामुळे गावकºयांमध्ये जलसाक्षरता वाढली. शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुषार सिंचनाचा वापर करू लागले. कमी पाण्यामध्ये जास्त सिंचन होत आहे. यावर्षी पावसात सातत्य नसतानादेखील दोडकी परिसरातील शेतकºयांनी विविध जलस्त्रोतांच्या आधारे सोयाबीन व अन्य पिके फुलविली असल्याचे दिसून येते. गत दोन वर्षांपासून गाव टँकरमुक्त झालेले आहे. लोकसहभागातून गावकºयांनी साधलेली जलसमृद्धीची ही किमया इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

कधीकाळी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. लोकसहभागातून व संपूर्ण गावकºयांच्या एकजुटीतून विविध प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात आली. परिणामी आता गाव टँकरमुक्त तर झाले आहेच; शिवाय पावसाने दडी दिलेली असतानाही विविध प्रकारच्या जलस्त्रोतांच्या माध्यमातून पिकांना सिंचन करणे शक्य झाले. जलपातळीत वाढ झाल्याने अन्य गावांच्या तुलनेत दोडकीतील पीक परिस्थिती बºयापैकी असल्याचे थोडेफार समाधान आहे.
- सुभाष नानवटे, ग्रामस्थ, दोडकी.

Web Title: Work of water conservation works from people's participation in tanker village.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.