गावठाण फिडरचे काम अर्धवट
By Admin | Updated: July 8, 2014 22:50 IST2014-07-08T22:50:12+5:302014-07-08T22:50:12+5:30
बांबर्डा येथील गावठाण फिडरची लाईन चालू होवून १ वर्ष झाले.

गावठाण फिडरचे काम अर्धवट
बांबर्डाकानकिरड : बांबर्डा येथील गावठाण फिडरची लाईन चालू होवून १ वर्ष झाले. परंतु गावातील मेन वॉटर सप्लायर पंम्प आजरोजी हा शेतातील लाईनवर जोडलेला आहे. जे सर्वात महत्वाचे काम आहे तेच अर्धवट आहे. ज्या पंपवर गावातील पूर्णपाणीपुरवठा आहे तोच पंम्प गावठाण फिडरवर न जोडल्यामुळे गावकर्यांनी पाणी असून सुद्धा विद्युत पुरवठयामुळे हाल सोसावे लागत आहे. गावातील वॉटर सप्लायरचा पंप हा शेतातील लाईनवर जोडला असल्याकारणाने शेतातील लाईन ही कधी दुपारी १.३0 वाजता येते तर कधी संध्याकाळी ६.३0 ला येते तर कधी कधी दोन दोन दिवस लाईन फॉल्टी राहते. त्यामुळे गावकर्यांना पाणी असून सुद्धा पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहे. हा पंम्प गावठाण फिडरवर जोडावा याकरिता वारंवार ठेकेदार व संबधितांना विनंती केली परंतु यावर अधिकारी व ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे आजही ते काम अर्धवट राहले आहे.